नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता 15 मे रोजी येणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे, मात्र बहुमतापासून दूर आहे. सात चॅनलच्या एक्झिट पोलच्या सरासरी आकडेवारीमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष दिसत आहे.
एबीपी-सी-व्होटरच्या एक्झिट पोलचे आकडे
एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या अंतिम एक्झिट पोलमध्ये भाजपला सरासरी 110, काँग्रेसला 88, जेडीएसला 24 आणि इतरांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. यावेळी कर्नाटकात 224 पैकी 222 जागांवर निवडणूक होत आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 112 आहे. एबीपी आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला केवळ दोन जागा कमी पडत आहेत.
इंडिया टुडे- अॅक्सिस : या एक्झिट पोलनुसार, भाजप 85, काँग्रेस 112, जेडीएस 26 आणि इतरांना एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.
टाइम्स नाऊ आणि चाणक्य : या एक्झिट पोलमध्ये भाजपला 120 जागांसह बहुमत मिळताना दिसत आहे, तर काँग्रेस 73, जेडीएस 26 आणि इतरांना तीन जागा मिळत आहेत.
न्यूज एक्स आणि सीएनएक्स : या एक्झिट पोलनुसार, भाजपला 106, काँग्रेसला 75, जेडीएसला 37 आणि इतरांना चार जागा मिळण्याचा अंदाज आहे.
न्यूज नेशन आणि प्रबोधन : या एक्झिट पोलनुसार भाजपला 107, काँग्रेसला 73, जेडीएसला 38 आणि इतरांना चार जागा मिळताना दिसत आहेत.
इंडिया टीव्ही-व्हीएमआर : या एक्झिट पोलनुसार, भाजपला 86, काँग्रेसला 96, जेडीएसला 35 आणि इतरांना तीन जागा मिळत आहेत.
रिपब्लिक टीव्ही-जन की बात : या एक्झिट पोलनुसार भाजपला 104, काँग्रेसला 77, जेडीएसला 37 आणि इतरांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे.
सात चॅनलच्या एक्झिट पोलची सरासरी
सात चॅनलच्या एक्झिट पोलची सरासरी काढली तर भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे, मात्र बहुमतापासून दूर आहे. भाजप 102, काँग्रेस 85, जेडीएस 32 आणि इतरांना तीन असं चित्र दिसत आहे.
कर्नाटक : भाजपची एक्झिट पोलमध्ये बाजी, मात्र बहुमतापासून दूर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 May 2018 04:58 PM (IST)
एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे, मात्र बहुमतापासून दूर आहे. सात चॅनलच्या एक्झिट पोलच्या सरासरी आकडेवारीमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष दिसत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -