बंगळुरु : कर्नाटकात राजकीय नाट्य दिवसेंदिवस वेगळ्याच मार्गाने जाताना दिसत आहे. कर्नाटक विधानसभेत आज बहुमत सिद्ध करण्याचं दिव्य कुमारस्वामींना करावं लागणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामींनी विधानसभा अध्यक्षांकडे दोन दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र विधानसभा अध्यक्ष आजच या सर्व प्रकरणावर तोडगा काढण्यावर आग्रही असल्याची माहिती आहे.
काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कर्नाटकात राजकीय पेच निर्माण झाला आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दोनवेळा दिलेली मुदत पुन्हा दोन दिवसांसाठी वाढवून देण्यात आली होती. आज कुमारस्वामी सरकारला कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामींनी आणखी दोन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र विधानसभा अध्यक्ष आजच बहुमत सिद्ध करण्यासाठी आग्रही आहेत.
सुप्रीम कोर्टाने कर्नाटक प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर आज कुमारस्वामी सरकारला आज संध्याकाळी पाच वाजता बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले होते.