Karnataka Lockdown: : कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्यामुळे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी कर्नाटकात 10 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 24 मे रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनची अमलबजावणी अत्यंत कडकपणे केली जाणार आहे. सकाळी सहा ते दहा या वेळेत जनतेला जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. सगळी हॉटेल बंद राहणार आहेत.


केवळ पार्सल सेवा उपलब्ध राहणार आहे. रस्त्याची कामे आणि बांधकाम उद्योग सुरू असणार आहे. लॉकडाऊन कालावधीत दहानंतर रस्त्यावर कोणालाही येण्यास परवानगी नाही. केवळ वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडण्याची अनुमती देण्यात आली आहे.सगळी दुकाने आणि उद्योग बंद राहणार आहेत.