Chhota Rajan Death Rumors : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ ​​छोटा राजनचं दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे कोविड 19 चा प्रादुर्भाव होऊन निधन झालं असल्याचं वृत्त आलं होतं. मात्र छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा एम्स आणि दिल्ली पोलिसांकडून इन्कार केला आहे. ऑल इंडिया रेडिओने यासंदर्भात ट्वीट करत ​​छोटा राजनचं एम्समध्ये कोरोनानं निधन झालं असल्याचं म्हटलं होतं.

  




छोटा राजनच्या विरोधाच दोन डझनहून अनेक केसेस सुरु आहेत. त्यापैकी 4 प्रकरणांमध्ये त्याला कोर्टानं शिक्षा सुनावली होती.  प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्याला मागील महिन्यात एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. 


सीबीआय गँगस्टर छोटा राजन याच्या विरोधात एकूण 68 खटल्यांचा तपास करीत आहे. त्यापैकी 35 प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे आणि 4 प्रकरणांमध्ये कोर्टाने त्याला दोषी ठरविले होते.


25 नोव्हेंबर 2015 ला इंडोनेशियातील बालीत राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 27 वर्ष भारतीय तपासयंत्रणेला गुंगारा देणाऱ्या राजनला 6 नोव्हेंबर 2015 ला भारतात आणलं होतं. भारतात आणल्यापासून उर्फ छोटा राजन विरोधातील देशभरातील सर्व खटले हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. याआधी पत्रकार जे.डे. हत्याकांड प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.