बंगळुरु : कर्नाटकात स्वतंत्र ध्वजाच्या मागणीने पुन्हा जोर धरला असून, यासाठी राज्य सरकारने 9 सदस्यांची ध्वज समिती स्थापन केली आहे. या नव्या ध्वजाला कायदेशीर मान्यता मिळवण्याचं मुख्य काम या समितीकडे सोपवण्यात आलं आहे.
सध्या देशात जम्मू-काश्मीर राज्याच्या ध्वजाला कायदेशीर मान्यता आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामैय्या सरकारने राज्याच्या स्वतंत्र ध्वजाच्या मागणीला हवा दिली आहे.
2002 मध्ये कर्नाटकात सर्वात पहिला राज्याच्या स्वतंत्र ध्वाजाची मागणी करण्यात आली. पण केंद्रातील तत्कालिन वाजपेयी सरकारने ही मागणी फेटाळली. यामुळे देशाच्या अखंडतेला धक्का लागत असल्याचं यावेळी वाजपेयी सरकारने स्पष्ट केलं होतं.
पण राज्यातल्या सिद्धरामैय्या सरकारने स्वतंत्र ध्वजाची मागणी पुढे रेटली असून, यासाठी स्वतंत्र ध्वज समितीही स्थापन केली आहे.
जम्मू-काश्मीरप्रमाणे आम्हालाही स्वतंत्र ध्वज द्या, कर्नाटक सरकारची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2017 03:09 PM (IST)
कर्नाटकात स्वतंत्र ध्वजाच्या मागणीने पुन्हा जोर धरला असून, यासाठी राज्य सरकारने 9 सदस्यांची ध्वज समिती स्थापन केली आहे. या नव्या ध्वजाला कायदेशीर मान्यता मिळवण्याचं मुख्य काम या समितीकडे सोपवण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -