Karnataka Exit Poll: कर्नाटक विधानसभेचे निकाल जाहीर होण्यास आता काही तासांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत देण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप नेत्यांनी सत्ता राखणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
बुधवारी, 10 मे रोजी मतदानानंतर जाहीर झालेल्या एबीपी न्यूज-सी-व्होटर एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला 100-112, भाजपला 83-95, जेडीएसला 21-29 आणि इतरांना 2-6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. एबीपी न्यूजनेही जात-समुदायाचा घटक समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एबीपी न्यूजसाठी सीव्होटरने जात-समुदायावर आधारित एक्झिट पोल केला आहे. यावरून लिंगायत, वोक्कालिग, मुस्लिम, ओबीसी, दलित आणि आदिवासी कोणत्या पक्षाशी जास्त आहेत याचा अंदाज लावता येतो.
लिंगायत समाजाचे मतदान कोणाला?
(स्रोत- सी व्होटर)
काँग्रेस - 26%
भाजपा- 56%
जेडीएस-12%
इतर -6%
वोक्कालिगा समाजाचा कल कोणाकडे?
(स्रोत- सी व्होटर)
काँग्रेस - 32%
भाजप - 28%
जेडीएस - 35%
इतर - 5%
लिंगायत आणि वोक्कालिगा समाजाचा कर्नाटकात मोठा प्रभाव मानला जातो. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे आहेत, तर माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी हे वोक्कलिगा समुदायाचे आहेत. त्याचा परिणाम जातीवर आधारित एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. आकडेवारीत, लिगायतांचा सर्वाधिक कल भाजपकडे (56 टक्के) दिसून येतो आणि वोक्कालिगासचा सर्वाधिक विश्वास जेडीएस (35 टक्के) आहे.
मुस्लिमांची मते कोणाला?
(स्रोत- सी व्होटर)
काँग्रेस-75%
भाजप-8%
जेडीएस-11%
इतर -6%
ओबीसींची मते कोणाला?
(स्रोत- सी व्होटर)
काँग्रेस-35%
भाजप-45%
जेडीएस-14%
इतर -6%
मुस्लिम समाजाच्या मतदारांची सहानुभूती काँग्रेसला असल्याचे एक्झिट पोलमधून दिसून आले आहे. मात्र, ओबीसींचा सर्वाधिक कल भाजपकडे असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही व्होट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. एक्झिट पोलच्या आकडेवारीत ओबीसींनी भाजपवर (45 टक्के) सर्वाधिक विश्वास व्यक्त केला आहे.
दलितांची मते कोणाला?
(स्रोत- सी व्होटर)
काँग्रेस-58%
भाजप-25%
जेडीएस-13%
इतर -4%
आदिवासींचे मत कोणाला?
(स्रोत- सी व्होटर)
काँग्रेस-46%
भाजप-35%
जेडीएस-13%
इतर -6%
एबीपी न्यूज-सी-व्होटरच्या जाती-आधारित एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की लिंगायतांनी भाजपला सर्वाधिक (56 टक्के), वोक्कालिगांनी जेडीएस (35 टक्के), मुस्लिमांनी काँग्रेस (75 टक्के), ओबीसींनी (45 टक्के) भाजपला मतदान केले आहे. दलितांनी काँग्रेसवर (58 टक्के) आणि आदिवासींनी (46 टक्के) विश्वास व्यक्त केला आहे.