Karnataka Assembly Election Result : कर्नाटक राज्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election Result) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. जवळपास 200 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेस 100 आणि भाजप 96 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. कल सातत्यानं बदलत आहेत.
आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. कारण आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कर्मनाटकची जनतेनं कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकला ते आज स्पष्ट होमार आहे. कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर बेळगावातील 18 मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील.
कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे.
2,615 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद
विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य 10 मे रोजी मतदान पेटीत बंद झालं.
बेळगावचा निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत येणार
बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आज दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. ही मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार असून कॉलेज परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.