नवी दिल्ली: कर्नाटक निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर, सरकारने झटका दिला आहे. कारण 19 दिवस चाललेल्या कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.


24 एप्रिलनंतर आज पहिल्यांदाच पेट्रोल 17 पैसे महागलं आहे, तर डिझेलमध्ये 21 पैशांची वाढ झाली आहे. आज सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत.

इंधनाचे दर दररोज बदलतात. मात्र 24 एप्रिलनंतर म्हणजेच कर्नाटक निवडणुकीदरम्यान या दरांमध्ये बदलच झाले नव्हते. पण मतदान होताच, पुन्हा एकदा इंधन दरात चढ-उतार सुरु झाली.

मुंबईत पेट्रोल 82 रुपये 48 पैशांवरुन 82 रुपये 65 पैसे झाले आहेत.

कोलकात्यात हाच दर 77 रुपये 32 पैशांवरुन 77 रुपये 50 पैसे झाला

तर चेन्नईत 77 रुपये 43 पैशांवरुन 77 रुपये 61 पैसे

डिझेलचे दर

मुंबईत डिझेलचे दर 70 रुपये 20 पैशावरुन 70 रुपये 43 पैशांवर पोहोचलं आहे.

पेट्रोल की कीमत 77 रुपये 32 पैसे से बढ़कर 77 रुपये 50 पैसे हो गई. वहीं चेन्नई में 77 रुपये 43 पैसे से बढ़कर 77 रुपये 61 पैसे तक पहुंच गई.

आजचे पेट्रोलचे दर (प्रति लिटर रुपये) :

मुंबई

पेट्रोल: 82.65

डिझेल : 70.43

पुणे -

पेट्रोल: 82.47

डिझेल : 69.20

नागपूर

पेट्रोल:  83.08.

डिझेल :70.90

औरंगाबाद-

पेट्रोल 83.66

डिझेल 71.45

नाशिक

पेट्रोल :82.95

डिझेल: 69.65