बंगळुरु : कर्नाटकातील मंगलोर इथं आणखी एका पोलीस उपअधीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 51 वर्षीय डीएसपी एम के गणपती यांनी आयुष्य संपवलं. त्यांनी सुसाईड नोटमध्ये शहर विकासमंत्री के जे जॉर्ज आणि अतिरिक्त पोलीस महासंचलाक ए एम प्रसाद यांनी छळ केल्याचा आरोप केला आहे.
याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी पोलीस उपअधीक्षक एस पी कलप्पा यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर गणपती यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
गणपती हे 1991 मध्ये पोलीस उपनिरिक्षक म्हणून रुजू झाले होते. बढती मिळत ते पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत पोहोचले. त्यांच्यावर बनावट एन्काऊंटर केल्याचा खटला सुरु होता.
कर्नाटकातील मदिकेरी इथल्या एका लॉजमध्ये गणपती यांनी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.