भोपाळ : मध्यप्रदेशच्या रिवा जिल्ह्यातील तमस नदीच्या पूर्वा धबधब्यात चार तरुण वाहून गेले. हे तरुण वाहून जात असतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धबधब्याच्या जवळ अडकलेल्या एका तरुणाला वाचवण्याचा प्रत्यक्षदर्शींचा प्रयत्न अपयशी ठरला.

 

 

पूर्वा धबधब्यावर पिकनिकसाठी आलेले हे चार तरुण अडकले. मदतीच्या अपेक्षेने चारही जण किनाऱ्याजवळ येत होते. जवळच्या लोकांनी दोरीची व्यवस्थाही केली होती. पण पाण्याचा प्रवाहामुळे तरुणांना दोरीपर्यंत पोहोचता आलं नाही. पाण्याच्या प्रवाहामध्ये पोहणंही कठीण होतं. अखेर चारही तरुण वाहून गेले. एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र उर्वरित तिघांबद्दल अद्याप समजू शकलेलं नाही.

 

 

मध्य प्रदेशात मागील दोन दिवसांपासून पावसाचा कहर सुरु आहे. पावसामुळे 6 ते 7 जिल्ह्याचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शिवाय सर्व सरकारी आणि खासगी शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

 

पाहा व्हिडीओ