Hijab controvercy : कर्नाटकातील (karnataka)महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थीनींच्या हिजाब घालण्यावरून चांगलाच वाद रंगला. महाविद्यालयीन प्रशासनाकडून विद्यार्थीनींच्या पेहरावाबाबत करण्यात आलेल्या कडक सक्तीमुळे आरोप-प्रत्यारोपही झाले. मात्र आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर येतेय. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कुंदापूरच्या एका सरकारी महाविद्यालयात हिजाब घातलेल्या विद्यार्थीनींना महाविद्यालय परिसरात प्रवेश देण्यात आला खरा, मात्र त्या विद्यार्थीनींना आता चक्क वेगळ्या वर्गात बसून शिक्षण घेण्याची वेळ आलीय. 





'हिजाब-केशरी शाल' वाद


कर्नाटकमधील (Karnataka) एका सरकारी कॉलेजमध्ये (government college) काही मुस्लीम विद्यार्थीनींनी हिजाब घातल्याने त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारला होता. कर्नाटकातील उडपी येथील कुंदापूर परिसरातील 'पीयू' महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडला.  या प्रकारामुळे हे कॉलेज चांगलेच चर्चेत आले. हिजाबवरून वाद निर्माण झाल्यानंतर कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश (Education Minister BC Nagesh)यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. हा वाद 20 दिवसांपूर्वी सुरू झाला आहे, त्यापूर्वी या महाविद्यालयात येणाऱ्या मुली या हिजाब घालत नव्हत्या असे शिक्षणमंत्री नागेश यांनी म्हटले होते. त्यानंतर या संबंधित मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आज कुंदापूर (kundapur) येथील व्यंकटरमण महाविद्यालयाच्या (vyankatraman college) विद्यार्थीनींच्या एका गटाने सोमवारी भगवी शाल परिधान करून मिरवणूकही काढली होती आणि कॅम्पसमध्ये पोहोचले. त्यानंतर कॉलेजचे प्राचार्य आणि तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला कॅम्पसमध्ये येण्यापासून रोखले. विद्यार्थिनींनी सांगितले की जर विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात येण्याची परवानगी नसेल तर त्या शालही घालतील. दरम्यान या विद्यार्थिनींना वेगवेगळ्या वर्गात बसण्यास सांगण्यात आले. यावर उडुपीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एसटी सिद्धलिंगप्पा यांनी सांगितले की, "कुंदापुरामधील परिस्थिती नियंत्रणात आहे आणि हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालय आणि कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जात आहे." उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सोमवारी 'हिजाब-केशरी शाल' वाद सुरूच राहिला. दरम्यान दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राज्य सरकार किंवा संबंधित महाविद्यालयीन व्यवस्थापनाच्या गणवेश अनिवार्य करण्याच्या सरकारी आदेशाचे उल्लंघन करत त्याचा निषेध व्यक्त केला.







हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना वेगळ्या खोलीत प्रवेश
मुख्याध्यापकांनी त्यांना आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाल काढून महाविद्यालयात जाण्यास होकार दिला. कुंदापूरच्या सरकारी पीयू कॉलेजमध्येही प्राचार्यांनी हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम मुलींशी बोलून त्यांना सरकारचा आदेश समजावून सांगितला, मात्र विद्यार्थिनींनी हिजाब घालणे सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर या विद्यार्थीनींना वेगळ्या खोलीत जाण्यास सांगण्यात आले. राज्यभरातील हा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे मुस्लिम मुलींचा एक गट महाविद्यालयात हिजाब घालण्यावर ठाम आहे, तर राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणवेश अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या :