भाजप 104 जागा मिळवत कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतापासून दूर आहे. काँग्रेसने 78 तर जेडीएसने 38 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कर्नाटकच्या 224 सदस्य असलेल्या विधानसभेच्या 222 जागांसाठी 12 मे रोजी 72.13 टक्के मतदान झालं.
आर आर नगर मतदारसंघात मतदानाचा गोंधळ झाल्यामुळे मतदान स्थगित झालं, तर जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचं निधन झाल्यामुळे इथे मतदानच झालं नाही. त्यामुळे या दोन विधानसभा मतदारसंघाचा निकाल येणार नाही.
हुबळी-धारवाडमध्ये घोळ
हुबळी-धारवाड मध्य या मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे निकाल रद्दबातल करण्यात आला होता. भाजपचे जगदिश शेट्टर यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं, मात्र निकाल रद्द झाल्याने भाजपचं संख्याबळ 103 वर पोहचलं. पण निवडणूक आयोगाने रात्री उशिरापर्यंत याबाबतचा तांत्रिक घोळ मिटवला.
पण पुन्हा त्याबाबतची खातरजमा केल्यानंतर, भाजपने जिंकलेली ही जागा त्यांच्याच पारड्यात पडली.
उर्वरित 221 जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकत? बहुमताचा 112 हा आकडा कोण गाठतं? कर्नाटक विधानसभेची सत्ता कोण काबिज करतं, याबाबत उत्सुकता होती.
मतमोजणीत आधी काँग्रेसची आगेकूच, मग त्रिशंकू स्थिती वाटत असताना, भाजपने मुसंडी मारत एकहाती सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली. भाजपने बहुमताचा आकडा पार केला होता. मात्र त्यांची आघाडी पुन्हा कमी झाली. मग काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला आणि कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली.
काँग्रेसचे सात आणि जेडीएसचे चार आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना कर्नाटकबाहेर धाडणार आहे. आपल्याकडे 118 आमदारांचं बळ असल्याचा दावा काँग्रेसने केला. दोन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने जेडीएससोबत सत्तास्थापन करण्याचा विश्वास काँग्रेसतर्फे व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले. कार्यकर्त्यांच्या घामामुळे राज्यात कमळ फुलल्याच्या भावना मोदींनी व्यक्त केल्या.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
- भाजप 104
- काँग्रेस 78
- जनता दल (सेक्युलर) 38
- बहुजन समाज पार्टी 1
- कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
- अपक्ष 1
एकूण 222
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live Update
2.00 AM - हुबळी-धारवाडमधील तांत्रिक घोळ दूर, भाजपचे जगदिश शेट्टर विजयी घोषित
10.30 PM हुबळी-धारवाड मध्य या मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे निकाल रद्दबातल. भाजपचं संख्याबळ 103 वर.
9.30 PM भाजपच्या आमदारांची बैठक उद्या होणार असून त्यानंतर येडियुरप्पा राज्यपालांची भेट घेतील. त्यानंतर सत्तास्थापनेचा अधिकृत दावा सादर करण्यात येईल. 17 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे.
8.20 PM काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसला मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचेही राहुल गांधी यांनी ऋण मानले
8.10 PM घामाच्या वासातून कमळ फुलवता येऊ शकते, हे सिद्ध झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले
8.05 PM हिंदी भाषिक राज्यांमध्येच भाजप सत्ता स्थापन करु शकतं, अशी पक्षाची प्रतिमा होती. मात्र भाजपने बिगरहिंदी राज्यांमध्येही सत्ता स्थापन केली.
8.02 PM
7.55 PM काँग्रेसच्या जागा कमी झाल्या, आम्ही 40 वरुन 104 जागांवर पोहचल्याचा आनंद आहे. भाजपने सलग 15 व्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केली.
6.10 PM आमच्याकडे 118 आमदारांचं बळ, काँग्रेसचा दावा, दोन अपक्षांचा पाठिंबा असल्याचाही काँग्रेस-जेडीएसला विश्वास
5. 45 PM काँग्रेस आणि जेडीएस यांचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव
5. 25 PM जेडीएस नेते कुमारस्वामी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात दाखल झाले, मात्र आपल्याला गेटबाहेरच रोखण्यात आलं, असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे
5 PM भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांच्या अवधीची मागणी केली.
4.50 PM कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द
4.11 PM कुमारस्वामी यांच्या घराबाहेर जेडीएस कार्यकर्त्यांचा जल्लोष, कुमारस्वामी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होण्याचं जवळपास निश्चित
कर्नाटकात ट्विस्ट: सर्वात कमी जागा, तरीही जेडीएसचा मुख्यमंत्री?
4.10 PM कर्नाटकातील जनेतेने काँग्रेसला नाकारलं आहे. जनता काँग्रेस मुक्त कर्नाटकला साथ देत आहे. जनतेने नाकारुनही काँग्रेस सत्तास्थापनेचा दावा करत आहे- येडियुरप्पा
3. 45 PM कर्नाटकच्या जनतेचा कौल कुमारस्वामींना, आमचाच मुख्यमंत्री होईल - जेडीएस प्रवक्ते
3.19 PM काँग्रेसचा प्रस्ताव जेडीएसने स्वीकारला, जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्री होण्याची शक्यता
3.18 PM भाजप नेते प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, जे पी नड्डा कर्नाटकाकडे रवाना, भाजपकडूनही हालचालींना वेग, काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत सकाळपासून बंगलोरमध्येच
3.15 PM थोड्याच वेळात अंतिम निकाल येईल, त्यानंतर आम्ही पुढील रणनीती ठरवू, काँग्रेस आणि जेडीएसबद्दल आताच बोलणार नाही - भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा
2.57 PM - जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेसाठी जेडीएसला पाठिंबा जाहीर करतो: काँग्रेस
2.33 PM - कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 106 काँग्रेस - 73 जेडीएस – 41 इतर - 02
2.32 PM -सोनिया गांधी स्वत: जेडीएस प्रमुख देवेगौडा यांच्याशी चर्चा करणार, कर्नाटक राखण्यासाठी काँग्रेस जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्याच्या तयारीत - टाईम्स नाऊ
सोनिया गांधी देवेगौडांशी चर्चा करणार?
देशात ठिपक्यापुरती उरलेल्या काँग्रेसने कर्नाटकसारखं मोठं राज्य राखण्यासाठी हालचालींना वेग आणला आहे. त्यासाठीच काँग्रेस जेडीएसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत.
त्याबाबत स्वत: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी हे जेडीएसचे सर्वेसर्वा आणि कुमारस्वामी यांचे वडील एच डी देवेगौडा यांच्याशी बातचीत करण्याची शक्यता आहे.
2.16 PM निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन भाजपने सर्वांच्या मनातला संशय काढून टाकावा : उद्धव ठाकरे
2.15 PM काँग्रेस जेडीएसला पाठिंबा देण्याची शक्यता, कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्याचे संकेत, सूत्रांची माहिती
2.11 PM भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी एस येडियुरप्पा शिकारीपुरा मतदारसंघातून ३५,३९७ मतांनी विजयी. बी.एस. येडियुरप्पा यांना ८६ हजार९८३ मतं मिळाली, तर काँग्रेस उमेदवाराला ५१ हजार ५८६ मतं. १९९९ चा अपवाद वगळता १९८३ पासून ते शिकारीपुरामधून निवडून येत आहेत
2.07 PM - जनतेची विकासाला साथ आहे. काँग्रेसच्या जातीय राजकारणाला ही चपराक आहे: भाजप नेते प्रकाश जावडेकर
https://twitter.com/abpmajhatv/status/996323709731323904
2.05 PM भाजपला बहुमत मिळालेलं नाही, पण एक मोठं राज्य हातातून जाणे हे योग्य नाही, देवेगौडा यांनी तयारी दाखवली तर उद्या काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करु शकेल : पृथ्वीराज चव्हाण
1.54 PM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 106 काँग्रेस - 73 जेडीएस – 41 इतर - 02
01.05 PM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 108 काँग्रेस - 72 जेडीएस – 40 इतर - 02
12. 23 PM ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो, कर्नाटक निवडणूक निकालावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
https://twitter.com/RajThackeray/status/996282400517767168
11.44 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 113 काँग्रेस - 67 जेडीएस - 40, अपक्ष 2
11.31 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 112 काँग्रेस - 68 जेडीएस – 40 इतर - 02
11.29 AM कर्नाटकचा निकाल : बेळगाव निवडणूक निकाल 2018 : भाजप – 07 काँग्रेस – 10 महाराष्ट्र एकीकरण समिती - 01
11.12 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 116 काँग्रेस - 63 जेडीएस – 41 इतर - 02
10.59AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 122 काँग्रेस - 58 जेडीएस – 42 इतर - 02
10.50 AM बेळगाव निवडणूक निकाल 2018 : भाजप – 11, काँग्रेस – 6, महाराष्ट्र एकीकरण समिती - 1 जागी आघाडीवर
10.45 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 114 काँग्रेस - 61 जेडीएस – 44 इतर - 02
10.32 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 114 काँग्रेस - 65 जेडीएस – 41 इतर - 02
10.16 AM बेळगाव निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट : भाजप – 9, काँग्रेस – 1, महाराष्ट्र एकीकरण समिती - 1 जागी आघाडीवर
10.12 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 110 काँग्रेस - 69 जेडीएस – 41 इतर - 02
10.03 AM भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी एस येडियुरप्पा शिकारीपुरा मतदारसंघात 9000 मतांनी आघाडीवर
10.00 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 109 काँग्रेस - 67 जेडीएस – 45 इतर - 02
9.51 AM भाजपच्या आघाडीनंतर शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 246 अंकांनी वधारला
9.49 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 106 काँग्रेस - 64 जेडीएस – 45 इतर - 02
9.47 AM कर्नाटकचा निकाल (कल) : (निवडणूक आयोगाची आकडेवारी स. 9.44 वाजेपर्यंत) भाजप - 61 काँग्रेस - 40 जेडीएस – 25 इतर - 3 एकूण - 129
9.45 कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 104 काँग्रेस - 68 जेडीएस – 43 इतर - 02
9.44 AM कर्नाटकात भाजपचं शतक पूर्ण, 104 जागांवर आघाडी
9.40 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 95 काँग्रेस - 79 जेडीएस – 41 इतर - 01
9.36 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 93 काँग्रेस - 81 जेडीएस – 40 इतर - 01
9.32 AM भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा शिकारीपुरा मतदारसंघात 3420 मतांनी आघाडीवर
9.28 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 95 काँग्रेस - 79 जेडीएस – 37 इतर - 01
9.27 AM बेळगाव निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट : भाजप – 5, काँग्रेस - 3 जागी आघाडीवर
9.20 AM चामुंडेश्वरी मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या 11 हजार मतांनी पिछाडीवर
9.19 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 86 काँग्रेस - 76 जेडीएस – 30 इतर - 01
9.09 AM कर्नाटकचा निकाल (कल) : बेळगावात भाजप 2, काँग्रेस 1 जागी आघाडीवर
9.04 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 82 काँग्रेस - 80 जेडीएस – 25 इतर - 01
9.03 AM कर्नाटक विधानसभा त्रिशंकू दिशेने
9.00 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 83 काँग्रेस - 79 जेडीएस - 25, अपक्ष 1
8.54 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 78 काँग्रेस - 74 जेडीएस - 25
8.53 AM भारतीय मतदार कोणाला निवडून आणत नाही, तर ते पाडतात : गिरीश कुबेर
8.47 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 77 काँग्रेस - 67 जेडीएस - 25
8.43 AM कर्नाटकचा निकाल (कल) : भाजप - 73 काँग्रेस - 66 जेडीएस - 24
8.38 AM जेडीएस किंगमेकर होण्याच्या स्थितीत, काँग्रेस-भाजपत काट्याची टक्कर
8.36 AM भाजपकडून काँग्रेस ओव्हरटेक, कर्नाटकचा निकाल: भाजप 63, काँग्रेस 60, जेडीएस 23 आघाडीवर
8.34 AM भाजप - 58, काँग्रेस - 60, जेडीएस - 16 जागांवर आघाडीवर
8. 31 AM कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून पिछाडीवर, तर बदामी मतदारसंघात आघाडीवर
8.31 AM भाजप 55, काँग्रेस 58, जेडीएस 16 आघाडीवर
8.30 AM काँग्रेसची आगेकूच, आतापर्यंत 56 जागांवर आघाडी
8.28 AM बेळगावची मतमोजणी अर्धा तास उशिराने
8.27 AM कर्नाटकचा निकाल : काँग्रेस 53 जागांवर, भाजप 43, तर जेडीएस 13 जागांवर आघाडीवर
8.25 AM कर्नाटकचा निकाल : भाजप 28, काँग्रेस 39, जेडीएस 12 आघाडीवर
8.20AM मध्य कर्नाटकात भाजप, तर कोस्टल कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर
8.14 AM पहिला कल काँग्रेसच्या बाजूने, 22 जागांवर आघाडी – प्रजा टीव्ही
8.11 AM काँग्रेसची आगेकूच, भाजप 17, काँग्रेस 21, जेडीएस 10
8.07 AM पहिले कल हाती, पोस्टल मतमोजणीत काँग्रेस 12, भाजप 3 तर जेडीएसला दोन जागांवर आघाडी
8.04 पहिले कल काँग्रेसच्या बाजूने: भाजप 3, काँग्रेस 10, जेडीएस 2
8.00 AM मतमोजणी सुरु
7.49 AM 38 मतदान केंद्रावर 8 वा मतमोजणी सुरु होणार
7.44 Am थोड्याच वेळात पहिले कल हाती
संबंधित बातम्या
काँग्रेस की भाजप, कर्नाटकात सत्ता कोणाची?
PHOTO : कर्नाटक निवडणूक निकाल 2018 : कर्नाटकातील बिग फाईट्स https://goo.gl/7bHmNs