Kargil Vijay Diwas 2023 : 1999 साली भारत (India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) सैन्यात कारगिल युद्ध झाले होते, जे सुमारे 60 दिवस चालले आणि 26 जुलै रोजी संपले. या युद्धात भारताचा विजय झाला. कारगिलच्या युद्धात भारताने मिळवलेला विजय 'कारगिल विजय दिवस' (Kargil Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे.
कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वाची घटना आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं आणि विजय मिळवला. कारगिल युद्धात भारताने मिळवलेला विजय ही पाकिस्तानची भळभळती जखम आहे. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून 26 जुलैला 'कारगिल विजय दिवस' (Kargil Vijay Diwas 2023) साजरा केला जातो.
विजय दिन का साजरा केला जातो?
1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यात भारताने विजय मिळवला होता. त्या युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवस दरवर्षी कारगिलच्या द्रास येथील युद्ध स्मारकात साजरा केला जातो. 1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारताच्या या शिखरांवर घुसखोरी केली होती. 14 ते 18 हजार फूट उंचीवर असलेल्या या शिखरावरून भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं. या युद्धामध्ये आपले 500 सैनिक शहीद झाले होते. हे युद्ध लष्करी इतिहासामध्ये एक अतिशय कठीण आणि धोकादायक युद्ध म्हणून ओळखले जाते.
कारगिलच्या शहिदांना विनम्र अभिवादन
'ऑपरेशन विजय'मध्ये भारताच्या अनेक शूर सैनिकांना प्राण गमवावे लागले, दरवर्षी कारगिल विजय दिवसानिमित्त (Kargil Vijay Diwas 2023) देशाच्या शूर सैनिकांचे स्मरण करून त्यांच्या शौर्याच्या आणि शौर्याच्या गाथा सर्वत्र सांगितल्या जातात. कारगिल युद्धात देशाच्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे किस्से सर्वत्र ऐकू येत होते. तसे पाहता, 1999 च्या युद्धात देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांची यादी मोठी आहे. या युद्धात प्राणाची आहुती देणारा प्रत्येक सैनिक देशाचा वीर आहे. ज्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या :