दक्षिणेतल्या राजकीय पक्षांनी त्याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तमिळनाडूमधील मक्लल नीधी मैय्यमचे नेते आणि अभिनेते कमल हासन यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
नाव न घेता हासन यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. हासन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, 1950 साली भारत देश विविधतेत एकात्मतेच्या वचनावर लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झाले आहे. आता कोणताही शाह, सुल्तान किंवा सम्राट ही बाब नाकारु शकत नाही.
कमल हासन म्हणाले की, मी सर्व भाषांचा सन्मान करतो. परंतु माझी मातृभाषा तमिळ आहे आणि राहील. हासन एवढ्यावरच थांबले नाहीत. अधिक आक्रमक होत ते म्हणाले की, पुन्हा एकदा भाषेसाठी आंदोलन करावं लागलं तर ते आम्ही करु. यावेळी जे आंदोलन होईल ते जलिकट्टू आंदोलनापेक्षाही मोठं असेल.