पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी कबड्डीपटू रोहित चिल्लरला अटक
एबीपी माझा वेब टीम | 21 Oct 2016 11:46 AM (IST)
मुंबई : भारताचा स्टार कबड्डीपटू रोहित चिल्लरला पत्नी ललिताच्या आत्महत्येप्रकरणी बेड्या पडल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या पथकाने मुंबईत चिल्लरला अटक केली. रोहितचे वडील विजय यांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. रोहितने आपण पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी निर्दोष असल्याचा दावा केला आहे. आपण तिचा हुंड्यासाठी कधीच छळ केला नाही, आपल्यावर लागलेले सर्व आरोप चुकीचे आहेत, असं रोहितने म्हटलं आहे. रोहितच्या पत्नीने आत्महत्येपूर्वी ऑडिओ क्लीप आणि सुसाईड नोटच्या माध्यमातून रोहित आणि त्याच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले होते. याआधारे पोलिसांनी पती रोहित चिल्लर आणि त्याच्या आईवडिलांविरोधात एफआयआर नोंदवला होता. पत्नीच्या आत्महत्येनंतर रोहित चिल्लर परागंदा झाला होता. तो आता समोर आला असून त्याने फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनही आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. 'माझं ललितावर मनापासून प्रेम होतं. मी तिच्याशी प्रतारणा केली नाही. मी तिला कधीच त्रास दिला नाही.' असं त्याने म्हटलं आहे.