नवी दिल्ली : देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नथालापती व्यंकट उर्फ एनव्ही रमणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी 24 मार्चला एवव्ही रमणा यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्या नावाला आता राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. न्यायमूर्ती एनव्ही रमणा हे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.
देशाचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एनव्ही रमणा हे 24 एप्रिलला आपल्या पदाची शपथ घेणार आहेत. एनव्ही रमणा यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील कृष्णा या जिल्ह्यात पोन्नावरम या गावात झाला. मृदुभाषी स्वभावाचे व्यक्ती असलेल्या एनव्ही रमणा यांनी 1983 साली आपल्या वकिलीची सुरुवात केली. त्यांनी केंद्र सरकारसाठी अतिरिक्त स्थायी वकील तसेच केंद्रीय प्रशासनिक अधिकरणामध्ये रेल्वेसाठी स्थायी वकील म्हणून काम केलंय. 2000 साली ते आंध्र प्रदेशच्या स्थायी न्यायालयाचे न्यायाधीश बनले.
एनव्ही रमणा यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला, अनेक ठिकाणी आपले रिसर्च पेपर्स प्रकाशित केले.
2013 साली त्यांची नियुक्ती दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून झाली. 2014 साली एनव्ही रमणा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम सुरु केलं.
गेल्या काही वर्षात एनव्ही रमणा यांनी अनेक महत्वपूर्ण खटल्यांचा निकाल दिला. त्यामध्ये जम्मू काश्मिरला इंटरनेट सुविधा पुन्हा देण्याचा निर्णयाचा समावेश होता. सरन्यायाधीशांचे कार्यालय माहितीच्या अधिकाराच्या कायद्याखाली आणण्याचा जो निर्णय देण्यात आला, तो निर्णय देणाऱ्या बेन्चमध्ये एनव्ही रमणा यांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या :
- BJP Foundation Day : संकट काळात तयार झाला नव्या भारताच्या विकासाचा आराखडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- Coronavirus In India | भारतात कोरोनाचा उद्रेक का होतोय? केंद्र सरकारचे काही अनुमान
- कोरोना लस घेतल्यावर महिलांना सोन्याचा दागिना, पुरुषांनाही खास भेटवस्तू