रायपूर : भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यालयात भाजप नेत्यांनी एका पत्रकाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपच्या चार नेत्यांना शनिवारी रात्री रायपूर पोलिसांनी अटक केली आहे.
शनिवारी भाजपच्या पक्ष कार्यालयात जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी रायपूरमधील अनेक पत्रकार पक्ष कार्यालयात दाखल झाले होते. याचदरम्यान रायपूरमधील एका वेबसाईटच्या पत्रकाराला भाजपच्या नेत्यांनी जबर मारहाण केली. भाजपचे रायपूर जिल्हाध्यक्ष राजीव अग्रवाल, स्थानिक नेते दिना डोंगरे, विजय व्यास, उत्कर्ष त्रिवेदी या चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंबधीचे वृत्त प्रकाशित केले आहे.
पत्रकार सुमन पांडे हे भाजपने पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी तिथे गेले होते. या बैठकीला भाजपाचे अनेक स्थानिक नेते आणि रायपूर भाजपाचे अध्यक्ष राजीव अग्रवाल उपस्थित होते. बैठकीदरम्यान भाजपच्या नेत्यांमध्ये आपसात वादावादी सुरु झाली. हा प्रकार पांडे त्यांच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत होते. त्यामुळे अग्रवाल आणि त्रिवेदी यांनी पांडेंना व्हिडीओ मोबाईलमधून डिलीट करण्यास सांगितले. परंतु पांडेंनी त्यास नकार दिला. पांडेंच्या नकारानंतर अग्रवाल आणि इतर भाजप नेत्यांनी पत्रकार पांडेंना बेदम मारहाण केली.
भाजप नेत्यांची पक्ष कार्यालयात पत्रकाराला बेदम मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2019 03:09 PM (IST)
भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यालयात भाजप नेत्यांनी एका पत्रकाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपच्या चार नेत्यांना शनिवारी रात्री रायपूर पोलिसांनी अटक केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -