सिमांचल एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 7 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2019 07:03 AM (IST)
ही घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. सीमांचल एक्सप्रेसचे 9 डब्बे सहदेई स्टेशनजवळ पटरीवरुन खाली उतरले. ही दुर्घटना कशामुळे घडली याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
पाटना : बिहारच्या हाजीपूरजवळ सिमांचल एक्स्प्रेस रुळावरुन घसरली आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत काहीजण जखमी झाल्याचीही माहिती आहे. बिहारच्या वैशालीमध्ये सीमांचल एक्स्प्रेसचे 9 डबे रूळावरून घसरले. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 12 हून अधिक लोक जण जखमी झाले आहेत. एसी कोचचं या अपघातात मोठं नुकसान झालं आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. तसंच 2 एक्स्प्रेसही बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही एक्सप्रेस जोगबनीवरुन दिल्लीकडे जात होती. त्यावेळी ही घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. एक्सप्रेसचे 9 डब्बे सहदेई स्टेशनजवळ पटरीवरुन खाली उतरले. ही दुर्घटना कशामुळे घडली याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.