नवी दिल्ली : देशविरोधी घोषणाबाजीप्रकरणी जेलची हवा खाल्लेल्या जेएनयू विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला 10 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. तर उमर खालिदवर एक सेमिस्टरसाठी बंदी घालून त्याला 20 हजारांचा दंड ठोठावला आहे. जेएनयू प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

 

देशविरोधी घोषणांप्रकरणी विद्यापीठाने एका उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापन केली होती. समितीने 11 मार्च रोजी अहवाल सादर केला. यानंतर या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

संसद हल्ल्याचा दोषी अफझल गुरुला फासावर लटकवल्याला तीन वर्ष झाल्याच्या निमित्ताने 9 फेब्रुवारी रोजी जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी झाल्या होत्या. देशद्रोहाच्या आरोपाखाली कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांना अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही जामिनावर जेलबाहेर आहेत.

 

याशिवाय अनिर्बानला 20 हजारांच्या दंड ठोठावला असून 15 जुलैपर्यंत विद्यापीठातून काढण्यात आलं आहे. अभाविपच्या सौरभ कुमार शर्माला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.