रांची : वाहतुकीच्या नियमावर बोट ठेवत, बाईकवरून जाणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पावती फाडणाऱ्या जिल्हा पोलीसप्रमुखांनी आणखी एक डॅशिंग कारवाई केली आहे.

 

झारखंडची राजधानी रांचीमध्ये एसपी एस कार्तिक यांनी आगीत उडी घेत अग्नितांडवात अडकलेल्यांची मदत केली. कार्तिक यांना आगीत अडकलेल्या एकाला वाचवण्यात यश आलं, मात्र ते अन्य तिघांना वाचवू शकले नाहीत.

 

रांचीजवळ एका परिसरात आग लागल्याचं एस कार्तिक यांना समजलं. या आगीत काही रहिवाशी अडकल्याची माहिती नंतर त्यांच्या कानावर आली. मग कार्तिक यांनी कोणताही विलंब न लावता, स्वत: घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह पेटलेल्या घरात धाव घेतली. एका रहिवाशाला बाहेर काढण्यात कार्तिक यांना यश आलं. मात्र उर्वरित तीन जणांचा मृत्यू झाला.

 

कार्तिक हे 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कार्तिक हे रांचीचे जिल्हा वाहतूक विभाग प्रमुख होते, तेव्हा चांगलेच चर्चेत होते. गेल्या वर्षी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे, त्याला दंड ठोठावल्यामुळे कार्तिक यांचं नाव देशासमोर आलं होतं.

 

त्यावेळी धोनी नंबरप्लेट चुकीच्या ठिकाणी असलेली विंजेट बुलेट घेऊन रांचीच्या रस्त्यावर फेरफटका मारत होता. बाईकवर चुकीच्या ठिकाणी नंबर प्लेट लावल्याने पोलिसांनी धोनीवर 450 रुपयांचा दंड लावला.

संबंधित बातमी


एक कोटींच्या 'हमर'ची 'स्कॉर्पियो' म्हणून नोंदणी, धोनीला दंड


रांचीच्या रस्त्यावर धोनीची बाईक राईड


बाईक राईड धोनीला महागात, ट्रॅफिक पोलिसांकडून दंड