दिल्लीत एकाच रात्री 2 सिलेंडर स्फोट, 6 मृत्युमुखी 35 जखमी
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2016 03:54 AM (IST)
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली सिलेंडर स्फोटाच्या दोन घटनांनी हादरली आहे. गांधीनगर आणि सनलाईट कॉलनी परिसरात झालेल्या सिलेंडर स्फोटात 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, 35 हून अधिक जण जखमी आहेत. गांधीनगरच्या कैलाशनगर परिसरात तीनमजली इमारतीत संध्याकाळी 7 च्या सुमारास पहिला स्फोट झाला. स्फोटामुळे संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार समोरच्या इमारतीचा काही भाग खाली कोसळून रहिवासी जखमी झाले. सनलाईट कॉलनीत रात्री 8.30 वाजता एका तीनमजली इमारतीत दुसरा स्फोट झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तिसऱ्या मजल्यावरील एक महिला आणि तिच्या दोन मुलींचा समावेश आहे.