JEE Main आणि NEET 2021 च्या अभ्यासक्रमात अशा प्रकारचा बदल झाला तर येत्या काही दिवसात नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नवा अभ्यासक्रम जाहीर करण्यात येईल. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एनटीएला येत्या परीक्षांसाठी नवा अभ्यासक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून दरवर्षी JEE Main, NEET, CMAT, GPAT, UGC NET यासांरख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. गेल्या काही दिवसात केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत या विषयावर उच्च स्तरीय बैठका घेतल्या होत्या. त्यात असं ठरलं होतं की कोरोनामुळे रखडलेली प्रवेशप्रक्रिया परिस्थिची लक्षात घेता एनटीएने अभ्यासक्रम लवकर जाहीर करावा.
एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फेलोशिप या वेळेवर मिळण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक हेल्पलाइन नंबर सुरु करावा अशा प्रकारचे निर्देश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.
गेल्या महिन्यात एनटीएने हिंदी आणि इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर 9 क्षेत्रीय भाषांत JEE Main परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. परंतु यावर आयआयटीने अजून त्यांचे मत व्यक्त केले नाही.
फेब्रुवारी महिन्यात JEE Main 2021 होण्याची शक्यता
देशभरातील विविध इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी घेण्यात येणारी JEE Main पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे संकेत काही दिवसापूर्वीच एनटीएने दिले होते. कोरोनाच्या संक्रमणामुळे अद्याप प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे JEE Main फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येण्याची शक्यता एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या: