त्यामुळे जयललिता समर्थकांची चिंता वाढली आहे. काल हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
सध्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची देखभाल सुरु आहे. मदतीसाठी एम्सचे डॉक्टरही तामिळनाडूत दाखल झाले आहेत. तर सल्ला घेण्यासाठी लंडनच्या डॉक्टरांशीही संपर्क करण्यात आला आहे...
दरम्यान अपोल रुग्णालयातच काल रात्री तामिळनाडू मंत्रिमंडळाची आपात्कालिन बैठकही पार पडली.
जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी रातोरात पसरल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रुग्णालाबाहेर मोठी गर्दी केली.
दरम्यान, गर्दीमुळे काही गालबोट लागू नये, म्हणून रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या