नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या अपघाताचा राजकारण्यांपासून कलाकारपर्यंत अनेकांनी निषेध केला. बऱ्याच जणांनी सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर काहींनी रस्त्यावर उतरुन संताप व्यक्त केला. परंतु ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी केलेला निषेध सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

भाजपचा आमदार कुलदीप सिंह सेंगर हा उन्नाब बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दिल्लीत उन्नाव बलात्कार पीडितेवरील हल्ल्याचा निषेध केला. यात सपाचे खासदार राम गोपाल यादव आणि जया बच्चन यांचाही याच समावेश होता. परंतु या निषेधाचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. एका गंभीर मुद्द्याचा निषेध सुरु असताना, जया बच्चन आपल्या सहकारी खासदारांसोबत हसताना, थट्टा-मस्करी करताना दिसत आहेत.

या प्रकाराचा नेटकऱ्यांना जया बच्चन यांचा खरपूस समाचार घेतला. निवडक ट्वीटवर एक नजर...

एकाने ट्वीट केलं आहे की, उन्नाव प्रकरणाविरोधातील निषेधाचं गांभीर्य त्यांच्या हास्यातून दिसत आहे.


गंभीर, दु:खद घटना; आनंदी, हसतमुखाने चर्चा, आजचा ड्रामा, असं एका म्हटलं आहे.


गांधीजी वगळता उर्वरित सगळेत हसतच आहेत, असं ट्वीट एकाने केलं आहे.


हसणारे आणि आनंदी चेहरे कोणत्याही गुन्ह्याचा निषेध दाखवत नाहीत, हा फक्त त्यांचा राजकीय .... आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.


जया बच्चा हसत कशाचा विरोध करत आहे, असा प्रश्न एका ट्विपलने केला आहे.


हे किती आनंदी आहेत...



अपघातात पीडित तरुणी, वकील गंभीर जखमी
उन्नाव बलात्कार पीडित तरुणी, काकी, मावशी आणि वकील महेंद्रसिंह यांच्यासोबत रविवारी (28 जुलै) रायबरेली इथल्या जेलमध्ये कैद असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होती. परंतु रस्त्यात गुरबख्शगंज परिसरात एता भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणीच्या मावशीने स्थानिक रुग्णालयात प्राण सोडला. तर काकीला लखनौमधील ट्रॉमा सेंटरमध्ये मृत घोषित करण्यात आलं. या घटनेत पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. दोघेही ट्रॉमा सेंटरमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा यापूर्वीच संशयित मृत्यू झाला आहे.