श्रीनगर : उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताला 17 जवान गमवावे लागले आहेत. बारामुल्ला जिल्ह्यातील जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला करण्यात आला होता.


महाराष्ट्रानेही या हल्ल्यात तीन सुपुत्र गमावले आहेत. लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे, शिपाई संदीप सोमनाथ ठोक आणि शिपाई पंजाब जानराव उईके अशी या शहीदांची नावं आहेत. लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे साताऱ्याच्या जाशी गावचे आहेत, तर संदीप सोमनाथ ठोक नाशिकच्या खंडनगळीचे होते. शिपाई पंजाब जानराव उईके अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते.

उरी हल्ल्यात शहीद झालेले भारताचे जवान

1. सुभेदार कर्नल सिंग (जम्मू काश्मीर)

2. हवालदार रवी पॉल (जम्मू काश्मीर)

3. शिपाई राकेश सिंग (बिहार)

4. शिपाई जावरा मुंडा (झारखंड)

5. शिपाई नैमन कुजूर (झारखंड)

6. शिपाई पंजाब जानराव उईके (अमरावती, महाराष्ट्र)

7. हवालदार एन. एस. रावत (राजस्थान)

8. शिपाई गणेश शंकर (उत्तर प्रदेश)

9. नायक एसके विद्यार्थी (बिहार)

10. शिपाई बिस्वजीत घोराई (पश्चिम बंगाल)

11. लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे (जाशी, सातारा)

12. शिपाई जी दलाई (पश्चिम बंगाल)

13. लान्स नायक आर के यादव (उत्तर प्रदेश)

14. शिपाई हरिंदर यादव (उत्तर प्रदेश)

15. शिपाई संदीप सोमनाथ ठोक (खंडनगळी, नाशिक)

16. हवालदार अशोक कुमार सिंग (बिहार)

17. शिपाई राजेश सिंग (उत्तर प्रदेश)


संबंधित बातम्या :


 

उरी हल्ल्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा, तीन सुपुत्र शहीद


जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद


उरी हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच, भारतीय लष्कराची माहिती


पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी