Terrorist Arrested In Jammu : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिसांनी 11 जणांना अटक करून प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. एका अधिकाऱ्यानं मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रं आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह्य साहित्य जप्त करण्यात आली आहेत. "विश्वासार्ह माहितीच्या आधारे, अनंतनागच्या श्रीगुफवारा/बिजबेहारा भागात पोलीस/सुरक्षा दलांवर, विविध ठिकाणी उभारलेल्या अनेक चेक पोस्टवर हल्ला करण्याची बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेनं जैश-ए-मोहम्मदचा कट रचला होता", असं प्रवक्त्यानं सांगितलं. 


अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तींनी खुलासा केला की, ते जैश-ए-मोहम्मदचे साथीदार आहेत आणि ते पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या मालकांच्या थेट संपर्कात आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावर ते पोलीस/सुरक्षा दलांवर हल्ला करणार होते. "त्यांच्या खुलाशानंतर, आणखी दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली," ते म्हणाले, बिजबेहारा भागात सहा दहशतवाद्यांना अटक करून पोलिसांनी आणखी एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला.



बारामुल्लामध्ये अंमली पदार्थ-दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश


याआधी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात अंमली पदार्थ-दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला होता. ज्यामध्ये दोन लोकांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून 18 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलं होतं. एका पोलीस प्रवक्त्यानं सांगितलं की, दाचीकडून बसग्रानच्या दिशेने एक पोलिस पथक परिसरात गस्त घालत होते तेव्हा त्यांना दाचीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन वाहनं संशयास्पद स्थितीत दिसली. 


अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पोलीस वाहनांच्या दिशेने गेले आणि त्यांना पाहताच वाहनांच्या चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उरी येथील जबदा कमलकोट तहसीलमधील रहिवासी मोहम्मद साबीर बारवाल आणि सोपोरमधील रेबन रफियााबाद येथील परवेझ अहमद तंत्रे या दोघांनाही अटक करण्यात आली. "दोन्ही वाहनांची झडती घेण्यात आली आणि एका वाहनातून तीन हेरॉइनची पाकिटं आणि दुसर्‍या वाहनातून पाच पाकिटं जप्त करण्यात आली," असं त्यांनी सांगितलं.


"एकूण नऊ किलोग्रॅम वजनाच्या प्रतिबंधित पदार्थांची आठ पाकिटं जप्त करण्यात आली आहेत. काळ्या बाजारात बंदी घातलेल्या पदार्थांची किंमत सुमारे 18 कोटी रुपये आहे.", अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.