Pulwama Encounter : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील मित्रीगाम भागात बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली, या चकमकीत एक दहशतवादी मारला गेल्याची माहिती मिळाली. यानंतर गुरुवारी पोलिसांनी सांगितले की, पुलवामाच्या मित्रीगाम भागात सुरू असलेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. आतापर्यंत एकूण दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन AK-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.


आणखी एक दहशतवादी मारला गेला


काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, 'पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. स्थानिक दहशतवादी एजाज हाफिज आणि शाहिद अयुब अशी ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. दहशतवाद्यांकडून दोन एके 47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. दोघेही अल बद्रे संघटनेचे होते. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार म्हणाले की, 'चकमकीत ठार झालेले दोन्ही दहशतवादी मार्च-एप्रिल 2022 या महिन्यात जिल्ह्यात बाहेरून आलेल्या मजुरांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये सामील होते.' विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, "जैश-ए-मोहम्मद (JeM) संघटनेच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन-तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते." नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवल्यामुळे ही कारवाई मध्यंतरी थांबवण्यात आली होती.


नुकतेच तीन दहशतवादी मारले गेले
याआधी रविवारी (24 एप्रिल), जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातच सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत प्रतिबंधित संघटना लष्कर-ए-तैयबाच्या डेप्युटी कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आरिफ अहमद हजार उर्फ ​​रेहान (लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर बासितचा उप), अबू हुजैफा उर्फ ​​हक्कानी (पाकिस्तानी दहशतवादी) आणि श्रीनगरमधील खानयार येथील नथीश वानी उर्फ ​​हैदर अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.


महत्वाच्या बातम्या


Kulgam Encounter : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचा कट फसला, दोन दहशतवादी ठार


Jammu Kashmir : पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांचा खात्मा, 17 वर्षीय तरुणाचाही समावेश