Pahalgam Terror Attack LIVE: पहलगाल हल्ल्यात जीव गमावलेल्या संतोष जगदाळे अन् गणबोटे यांचं पार्थिव पुण्यात दाखल

Pahalgam terror attack: भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 28 जण मृत्युमुखी पडले आहेत.

रोहित धामणस्कर Last Updated: 24 Apr 2025 06:05 PM

पार्श्वभूमी

भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 26 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून मृतांच्या आकड्यात...More

पाणीटंचाईच्या झळा! लातूरच्या 13 गाव, 5 वाड्यांमध्ये टँकरपुरवठा सुरु

पाणीटंचाईच्या झळा... लातूर जिल्ह्यातील १३ गावं आणि ५ वाड्यांना २१ अधिग्रहणांद्वारे तर दोन तांड्यांना एका टँकरद्वारे सध्या सुरू आहे पाणीपुरवठा


A/c : लातूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. वाढत्या उन्हाबरोबरच जिल्ह्यातील काही भागात पाणीटंचाईच्या झळा ही तीव्र होत चालल्या आहेत. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने सध्या लातूर जिल्ह्यातील १३ गावे आणि ५ वाड्यांना विहीर आणि बोअरच्या अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा आणि वाघमारी तांडा या तांड्यांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, अशी माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. उन्हाच्या तीव्रतेमुळे खालावत असलेली पाणीपातळी लक्षात घेता येत्या महिन्यात जिल्ह्यात अधिग्रहणांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.