कुपवाडा : एकीकडे पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा मायदेशी परतीचा प्रवास सुरु झाला असताना जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी हाहाकार माजवला आहे. हंदवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलिस आणि दोन जवान शहीद झाले, तर नऊ जण जखमी आहेत.
चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू काश्मिर पोलिसातील दोन कर्मचारी शहीद झाले. एका सामान्य नागरिकाचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. नऊ जवान जखमी असून त्यामध्ये सैन्याच्या सात, तर सीआरपीएफच्या दोघा जवानांचा समावेश आहे. त्यांच्यावर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघा जवानांची प्रकृती गंभीर आहे.
दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी कुपवाडा जिल्ह्यातील बाबागुंड भागात शोध मोहीम सुरु केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरु केला. त्यानंतर सुरक्षा दलानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. चकमकीत दोन पोलिस आणि दोन जवान शहीद झाले
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी-सुरक्षा दलांची चकमक, दोन जवान आणि दोन पोलिस शहीद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2019 08:48 PM (IST)
हंदवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलिस आणि दोन जवान शहीद झाले, तर नऊ जण जखमी आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -