Jammu-Kashmir: भारतीय लष्कराकडून (Inian Army) दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) बारामुल्लाच्या क्रिरी गावा झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा जवानांनी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक एके 47, एक पिस्टल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. दहशतवाद्यांकडून मिळाले आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे.
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चकमक झाली. यामध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे गावात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा जवानांनी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यसाठी चारही बाजूने गावाला घेरले आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. सुरक्षा रक्षक आणि जवानांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जवानांकडून ऑपरेशन ऑलआऊट राबवलं जात आहे.
पुंछ दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद
जम्मू - काश्मीरमधील पुंछ(poonch) येथे गुरूवारी 20 एप्रिल रोजी जवानांच्या ट्रकवर दहशतवादी हल्ला(terror attack) झाला. या हल्यात पाच भारतीय जवान(indian army) शहीद झाले. हवालदार मनदीप सिंह, लान्स नायक देबाशिष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह अशी मृत जवानांची नावे आहेत. शहीद झालेले जवान भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते. या भागात दहशतवादविरोधी कारवायांसाठी ते तैनात होते. या हल्ल्याची जबाबदापी पीपुल्स अँटी फासिस्ट फ्रंट (PAFF)घेतली आहे.
ग्रेनेड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात चार दहशतवादी सहभागी असल्याचं समजतं. हल्ल्यानंतर गाडीच्या इंधन टाकीला आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण वाहन आगीत जळून खाक झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला झाला तेव्हा जवान वाहनातून काही सामान घेऊन जात होते. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G-20 परिषदेपूर्वी हा नियोजित हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :