Jammu Kashmir 3 Terrorists Killed in Pulwama Encounter : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामामध्ये (Pulwama) सैन्य दलाला मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलांना तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए तैयबाचे (Lashkar-e-Taiba) असल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांकडून हत्यारं आणि दारु गोळा जप्त केला आहे.


जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामामध्ये मृत्यू झालेले तीन दहशतवादी स्थानिक असल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी यासंदर्भात माहिती देत सांगितलं की, चकमकीत ठार झालेले तिन्ही दहशतवादी स्थानिक होते आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. या परिसरात सध्या नाकेबंदी करण्यात आली आहे.






 


लष्कराकडून तीन दहशतवादी ठार


पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं की, तिन्ही दहशतवादी स्थानिक होते आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. 


मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली


यातील एका दहशतवाद्याचं नाव जुनैद शेरगोजरी असून तो जम्मू-काश्मीरचे विशेष पोलीस अधिकारी रियाझ अहमद ठोकर यांच्या हत्येमध्ये सामील होता. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या चकमकीत ठार झालेल्या अन्य दोन दहशतवाद्यांची नावं फाजील नजीर भट आणि इरफान अह मलिक अशी आहेत. हे पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून दोन एके 47 रायफल आणि एक पिस्तूल, दारूगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडून शोध कार्य सुरू आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या