जम्मू : कुपवाडाजवळ लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 27 Apr 2017 08:39 AM (IST)
प्रातिनिधीक फोटो
जम्मू : जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एक मेजर, एक जेसीओ आणि एका जवानाचा समावेश आहे. तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यातही लष्काराला यश आलं आहे. लष्काराने या घटनेची अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. एकूण चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. यापैकी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर दोन जण अजूनही कॅम्पमध्येच लपले असण्याची शक्यता आहे. पहाटे चारच्या सुमारास हा हल्ला झाला. अजूनही गोळीबार सुरुच आहे. लपलेल्या उर्वरित दोन दहशतवाद्यांचा जवानांकडून शोध घेतला जात आहे. लष्कराच्या ज्या कॅम्पवर हल्ला करण्यात आला आहे, ते ठिकाणी एलओसीपासून (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) 5 किमी अंतरावर आहे.