श्रीनगर: पूर्वी पत्रकारिता करणाऱ्या आणि नंतर दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या एका दहशतवाद्याला लष्कराने कंठस्नान घातलं आहे. रईस अहमद भट असं या दहशतवाद्याचं नाव असून तो 'व्हॅली न्यूज सर्व्हिस' या नावाचं वेब पोर्टल चालवत होता. तो नंतर लष्कर ए तोय्यबा ही दहशतवादी संघटनेसाठी काम करु लागला होता अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. जम्मू पोलिसांच्या दहशतवाद्यांच्या 'क' श्रेणीत रईस भटचे नाव असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. 


रईस अहमद भट याने आपल्या पत्रकारितेचा वापर हा दहशतवादी कृत्यांसाठी केला. त्या माध्यमातून त्याने अनेक दहशतवादी कृत्यांना खतपाणी घातल्याचं स्पष्ट झालंय असं काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितलं. रईस अहमद भटवर या आधी दोन गुन्हे नोंद असल्याची माहितीही त्यांनी दिली. 


 






सुरक्षा दलांच्या या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये हिलाल अहमत रहम असं दुसऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे. राज्यातील अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये या दोन दहशतवाद्यांचा समावेश आहे. या दोन दहशतवाद्यांना मारल्यानंतर या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


ABP Majha