Jammu And Kashmir Election Result : जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. येथे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स  प्रणित आघाडीची सत्ता येणार आहे. लवकरच ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने संपूर्ण ताकत लावली होती. मात्र भाजपाला येथे अपेक्षाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. दरम्यान, आम आदमी पार्टीने मात्र येथे दमदार कामगिरी केली आहे. या पक्षाने जम्मू काश्मीरमध्ये आपलं खातं खोललं आहे. 


आप पक्षाने खातं खोललं


आम आदमी पार्टीने जम्मू आणि काश्मीर येथील निवडणुकीत डोडा विधानसभेच्या जागेवर आपला उमेदवार उभा केला होता. या जागेवर आम आदामी पार्टी (आप) या पक्षाला ऐतिहासिक विजय मिळला आहे. हा मतदारसंघ उधमपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. डोडा या जागेसाठी आम आदमी पार्टीतर्फे मेहराज मलिक यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी ही निवडणूक 4538 मतांच्या फरकांनी जिंकली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार गजय सिंह राणा हे आहेत. मलिक यांना 23228 तर यांना 18690 मतं मिळाली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर नॅसनल कॉन्फरन्सचा उमेदवार आहे.


 2014 साली भाजपाचा विजय


मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर डोडा विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाले. डोडा आणि डोडा पश्चिम असे या दोन मतदारसंघांचे नाव आहे. डोडा या मतदारसंघात मुस्लीम मतांची संख्या जास्त आहे. तर डोडा पश्चिम मतदारसंघांत हिंदू मतदारसंघाचे प्रमाण जास्त आहे. 2014 साली भाजपाने डोडा या मतदारसंघावर विजय मिळवला होता. यावेळच्या निवडणुकीतही भाजपाने आपला उमेदवार न बदलता गजय राणा यांना उमेदवारी दिली होती. मात्र गजय राणा यावेळी पराभूत झाले. 


काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्समध्ये मैत्रिपूर्ण लढत


या जागेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने खालीद नजीब सुहरवादी यांना तर पीडीपीने मंसूर अहमद भट यांना तिकीट दिले होते. या जागेवर एकूण 9 उमेदवार निवडणूक लढवत होते. जम्मू काश्मीरमध्य नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यात युती झाली होती. हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीअंतर्गत निवडणूक लढवत होते. या जागेवर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाने आपापले स्वतंत्र उमेदवार दिले होते. म्हणजेच या दोन्ही पक्षांत येथे मैत्रिपूर्ण लढत होत होती. काँग्रेसच्या उमेदवाराला या जागेवर फक्त 4170 मते मिळाली. 


दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 90 जागांसाठी मतदान झाले होते. यातील 29 जागा नॅशनल कॉन्फरन्स तर 5 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. भाजपाने आतापर्यंत 17 जागा जिंकल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्स 17 जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. भाजपा आणखी 12 जागांवर आघाडीवर आहे.   


हेही वाचा :


Haryana Election: काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं


हरियाणाचा निकाल येताच चंद्रशेखर बावनकुळेंचा आत्मविश्वास थेट 'सातवें आसमान पर'; महाराष्ट्राच्या निकालाबाबत म्हणाले...