जालंधर (पंजाब) : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रयत्य गुरुवारी पंजाबच्या जालंधरमध्ये आला. उड्डाणपुलावरुन ट्रक थेट खालून जाणाऱ्या रिक्षावर कोसळला. सुदैवाची गोष्ट म्हणजे रिक्षा चालक सुखरुप आहे.

जालंधर-अमृतसर हायवेवर सरब मल्टीप्लेक्ससमोर एक भरधाव ट्रक उड्डाणपुलावरुन खाली कोसळला. ट्रकच्या पुढच्या टायरचा एक्सेल तुटल्याने हा अपघात झाला.

ज्यावेळी ट्रक खाली कोसळला, त्यावेळी खालून रिक्षा जात होती. ट्रक उड्डाणपुलावरुन थेट रिक्षावर पडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रक कोसळूनही रिक्षाचालक थोडक्यात बचावला. त्याला दुखापत झाली असून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघातात ट्रक चालकही जखमी झाला आहे. ट्रकचा एक्सेल तुटल्यानंतर टायर निघाल्याने अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. यामध्ये एक सायकलस्वारही अपघातातून कसा बालंबाल बचावला हेदेखील दिसत आहे.
पाहा व्हिडीओ