नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज गौतम गंभीरने अतिशय स्तुत्य पाऊल उचललं आहे. सुकमा हल्ल्यातील 25 शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गंभीर उचलणार आहे.
छत्तीसगडमधील सुकमामध्ये सोमवारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 74 बटालियनच्या 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले तर 6 जण जखमी झाले आहेत.
"गौतम गंभीर फाऊंडेशन सर्व शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे," असं सांगत गंभीरचे मीडिया मॅनेजरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
केंद्रीय शहरविकास आणि गृहनिर्मा मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी गौतम गंभीरच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. "शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलून गौतम गंभीरने नवा आदर्श समाजापुढे ठेवला. प्रेरणादायी," असं ट्वीट नायडू यांनी केलं आहे.
नक्षलवाद्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे.
संबंधित बातम्या
देशवासियांचा जीव इतका स्वस्त नाही, गंभीरचा निशाणा
5 नक्षल्यांना ठार करणारे जवान शेर मोहम्मद जखमी
सुकमा हल्ला : 25 CRPF जवानांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण?