PSLV-C54 Launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( Indian Space Research Organisation ) म्हणजेच इसरो ( ISRO ) आता आणखी एका गगन भरारीसाठी सज्ज झालं आहे. 26 नोव्हेंबरला इसरो 8 नॅनो उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून पीएसएलवी-सी54-इओएस-06 रॉकेट लाँच करण्यात येणार आहे. या रॉकेटमधून ओशनसॅट-3 ( Oceansat 3 ) उपग्रह आणि 8 नॅनो उपग्रहांचं प्रक्षेपण ( Nano Satellite Launch ) करण्यात येईल. शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 56 मिनिटांनी PSLV-C54 रॉकेट लाँच करण्यात येणार आहे.


PSLV-C54 रॉकेटमधून 'इओएस-06 (ओशनसॅट-3) आणि आठ छोटे सॅटेलाईट लाँच करण्यात येतील. यामध्ये पिक्सेलमधून आनंद आणि भूटानसॅट, ध्रुव अंतराळमधून दोन थायबोल्ट तर स्पेसफ्लाइट युएसएमधून चार अशा एकूण आठ छोट्या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे.




इसरोकडून खाजगी रॉकेट लाँच


अलिकडेच 18 नोव्हेंबर रोजी पहिलं खासगी रॉकेट विक्रम एसचं (Vikram-S) यशस्वी उड्डाण पार पडलं आहे. इसरोकडून 'मिशन प्रारंभ' (Mission Prarambh) अंतर्गत विक्रम एस या हायपरसोनिक रॉकेट लाँच करण्यात आलं. हे भारताचं पहिलं खासगी रॉकेट लाँच आहे. त्यामुळे देशात खासगी रॉकेट विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हैदराबादच्या स्कायरुट एरोस्पेस (Skyroot Aerospace) या खासगी कंपनीकडून विक्रम एस या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं


आता रॉकेट लाँच होणार स्वस्त


इसरोने कमी खर्चात क्षेपणास्त्र प्रक्षेपण ( Rocket Launch ) करण्याची योजना आखली आहे. या प्रक्षेपणात इंधनाऐवजी नैसर्गिक वायू ( LNG ) आणि लिक्विड ऑक्सिजन ( LoX ) यांचा वापर केला जाईल. हे इंधनाचे पर्याय कमी खर्चिक असल्याने यामुळे क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणं अधिक स्वस्त होणार आहे. स्कायरुट या खासगी कंपनीचं पहिलं रॉकेट लाँच यशस्वी झालं आहे. तर त्या आधी 25 नोव्हेंबर 2021 रोजी नागपुरातील सोलर इंडस्ट्री लि.ने पहिल्या थ्रीडी प्रिंटेड क्रायोजेनिक इंजनची यशस्वी चाचणी केली होती.


इसरोने 18 नोव्हेंबर 2022 रोजी पॅराशूट एअरड्रॉप चाचणी (IMAT) केली. इसरोने उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील बाबिना फील्ड फायर रेंज येथे आपल्या क्रू मॉड्यूल डिलेरेशन सिस्टमची इंटिग्रेटेड मेन पॅराशूट एअरड्रॉपची यशस्वी चाचणी (IMAT) केली.