ISRO recruitment 2021: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो ISRO) मध्ये अप्रेंटिसशिप करण्याचा विचार करणार्या तरुणांसाठी बातमी आहे. पदवीधर आणि टेक्नीशियन अप्रेंटिसशिपसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. इस्रोच्या बंगळुरु येथील मुख्यालयातून पदवीधर आणि टेक्नीशियन अप्रेंटिसशिपसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इस्रोच्या https://www.isro.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर हे अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 जुलै आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखे आधी किंवा त्यापूर्वी अर्ज भरावा लागणार आहे.
इस्रोने उमेदवारांना सांगितलं आहे की, त्यांनी 22.07.2021 च्या पूर्वी hqapprentice@isro.gov.in वर योग्य अप्रेंटिसशिप कॅटेगरीसाठीच्या अर्जासह पीडीएफ स्वरुपात कागदपत्रांची एक फाईल ईमेल करावी.
अप्रेंटिसशिपसाठी एकूण 43 जागा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो ISRO) ने अप्रेंटिसशिपसाठी एकूण 43 रिक्त जागा आहेत. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की निवड झाल्यानंतर पदवीधर प्रशिक्षणार्थीस 9000 रुपये मासिक वेतन आणि इतरांना दरमहा 8000 रुपये वेतन दिले जाईल. या अप्रेंटिसशिपसाठी 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवीधर शिक्षणासाठी अर्ज करू शकतात. तर, किमान 60% गुण असलेले डिप्लोमा अभियंता तंत्रज्ञ अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू शकतात.
निवडक उमेदवारांची नियुक्ती 12 महिन्यांसाठी असणार
कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा झालेल्यांसाठी अप्रेंटिसशिपची 20 पदे रिक्त आहेत. तर इस्रोने म्हटले आहे की, ‘निवड झालेल्या उमेदवारांची 12 महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली जाईल.’ अधिक माहिती किंवा लेटेस्ट अपडेटसाठी उमेदवारांनी https://www.isro.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळवर भेट द्या.
संबंधीत बातम्या
Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये 'या' पदावर नोकरीची संधी
Oil India Recruitment 2021 : ज्युनियर असिस्टंटच्या 120 पदांसाठी भरती, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI