श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आज पुन्हा एक नवा इतिहास रचला आहे. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी-45 यानाच्या मदतीने अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. या यानातून एमिसॅटसह अन्य 28 नॅनो उपग्रह अंतराळात झेपावले आहेत. त्यात अमेरिकेच्या 24, लिथुआनियाचे 2 तर स्पेन आणि स्वित्झर्लंडच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा समावेश आहे.


436 किलोग्रॅम वजनाचा हा एमिसॅट डीआरडीओचा आहे. यामुळे डीआरडीओला सुरक्षा संशोधनात मदत होणार आहे.  एमीसॅटच्या मदतीने भारताला आता शत्रू राष्ट्रांच्या हालचालींवर नजक ठेवता येणार आहे.  749 किलोमीटर अंतरावर असलेल्या क्लासमध्ये हे स्थापन करण्यात आले आहे.


तसेच या पीएसएलव्हीच्या माध्यमातून इस्रोनं याआधी दोन मोठ्या कामगिरी केल्या आहेत. ज्यात 2008 मधली चंद्रयान मोहीम आणि 2013 मधलं मंगल मिशन याचा समावेश होता. मार्स मिशन अर्थात मंगळ मोहिमेमुळे सर्व जगाच्या भुवया उंचावल्या होत्या. सर्वात कमी खर्चात आणि पहिल्याच प्रयत्नात इस्रोनं ही कामगिरी फत्ते केली होती. त्यामुळे आजही सर्व जगाच्या नजरा पुन्हा इस्रोकडे लागल्या आहेत.

VIDEO | इस्त्रोची नवी झेप, 28 देशांच्या उपग्रहांचं प्रक्षेपण | श्रीहरिकोटा | एबीपी माझा