Mission Prarambh : भारतातील पहिले खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट विक्रम-S (Vikram-S) प्रक्षेपणासाठी सज्ज असून देशात पहिल्यांदाच इस्रो (ISRO) अशाप्रकारचे रॉकेट प्रक्षेपित होणार आहे. याचे प्रक्षेपण 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता इस्रोच्या श्रीहरिकोटा येथून केले जाईल. हे रॉकेट हैदराबादस्थित कंपनी स्कायरूट एरोस्पेसने बनवले असून त्यात तीन पेलोड असतील. या मिशनला 'प्रारंभ' (Mission Prarambh) असे नाव देण्यात आले आहे. विक्रम-एस असे या रॉकेटचे नाव असून देशातील अंतराळ विज्ञानाच्या इतिहासातील हा एक 'टर्निंग पॉइंट' बोलण्यात येतोय. विक्रम-एस रॉकेटचे हे चाचणी उड्डाण असेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 


प्रथमच एका खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित होणार


देशात प्रथमच एका खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित होणार आहे. श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून हे प्रक्षेपण होणार आहे. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस कंपनीने हे रॉकेट बनवले आहे. कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक पवन कुमार चंदना यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ही चाचणी उड्डाण आहे. इस्रोने 18 नोव्हेंबर 2022 रोजी याच्या उड्डाणासाठी प्रक्षेपण विंडो निश्चित केली आहे.  पवन यांनी सांगितले की, हवामानाच्या अंदाजानुसार हे रॉकेट लॉन्च केले जाईल. विक्रम-एस असे या रॉकेटचे नाव आहे. ज्याला प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आणि इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले आहे. या प्रक्षेपणाला 'मिशन प्रारंभ' असे नाव देण्यात आले आहे. 


रॉकेट प्रक्षेपित करणारी पहिली खाजगी अंतराळ कंपनी


या मोहिमेसोबतच, हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करणारी पहिली खाजगी अंतराळ कंपनी बनणार आहे. याला ऐतिहासिकही म्हणता येईल, कारण या मोहिमेमुळे अवकाश क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मिशन सुरू करण्यासाठी या क्षेत्राला प्रेरित करत आहेत.


स्कायरूट आणि इस्रो यांच्यात करार 
या प्रक्षेपणासाठी स्कायरूट आणि इस्रो यांच्यात करार झाला आहे. स्कायरूटचे सीओओ आणि सह-संस्थापक नागा भारत डाका यांनी सांगितले की, विक्रम-एस रॉकेट हे सिंगल-स्टेज सब-ऑर्बिटल लॉन्च व्हेईकल आहे. जे त्याच्यासोबत तीन पेलोड घेऊन जात आहे. ही एक प्रकारची चाचणी आहे. त्यात यश आल्यास खासगी अंतराळ कंपनीच्या रॉकेट प्रक्षेपणाच्या बाबतीत भारत जागतिक आघाडीच्या देशांमध्ये सामील होईल.


विक्रम-एस काय आहे?


विक्रम-एस हे सिंगल स्टेज रॉकेट आहे, जे सब-ऑर्बिटल प्रक्षेपण रॉकेट आहे. जे श्रीहरिकोटा येथून तीन पेलोडसह उड्डाण करेल. स्कायरूट एरोस्पेसने अवकाश कार्यक्रमाचे जनक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावावरून रॉकेटचे नाव विक्रम ठेवले आहे. ही कंपनी व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी अत्याधुनिक प्रक्षेपण वाहने तयार करते.