Coronavirus Cases in India Today : देशातील कोरोना संसर्गात विक्रमी घट झाली आहे. देशात आज 474 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल दोन वर्षांनंतर एवढे कमी कोरोनाबाधित सापडले आहेत. देशात 06 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदा सर्वात कमी कोरोना रुग्ण सापडले आहेत. ही चांगली बातमी आहे. तर गेल्या 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


देशातील कोरोना संसर्गात विक्रमी घट


देशातील कोरोना संसर्गात मोठी घट झाली आहे. उपचाराधीन रुग्णांमध्येही कमालीची घट झाली आहे. 2020 सालानंतर आज पहिल्यांचा रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. देशात 474 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याआधी 06 एप्रिल 2020 रोजी सर्वात कमी 354 रुग्ण आढळले होते. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या सात हजारांवर आहे.


भारतात 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला


भारतात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. चीनमधून केरळमध्ये परतलेल्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर देशातील कोरोनाचा आलेख वाढतानाच पाहायला मिळाला. त्यानंतर मार्च महिन्यात देशात कोरोनाचा पहिला बळी गेला. कर्नाटकमधील एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट त्यांचे उपप्रकार सापडले. कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला असला तरी अद्यापही प्रादुर्भाव कायम आहे. 






चार कोटीहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 533 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 7 हजार 918 कोरोना उपचाराधीन आहेत. नवीन 474 रुग्णांसह देशातील एकूण 4 कोटी 46 लाख 67 हजार 398 इतकी झाली आहे. यामधील चार कोटीहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.