नवी दिल्ली : देशातील कोरोना विरोधातल्या लढाईत इस्त्रोने आतापर्यंत मोठं योगदान दिलं आहे. आताही इस्त्रोच्या वतीनं स्वदेशी बनावटीचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तयार करण्यात आलं आहे. त्याचे नाव 'श्वास' असं ठेवण्यात आलं आहे. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून रुग्णांना 95 टक्क्याहून अधिक गुणवत्तापूर्ण ऑक्सिजन मिळेल असा दावा इस्त्रोच्या वतीनं करण्यात आला आहे.


इस्त्रोने तयार केलेल्या या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रेशन स्विंग अॅबसॉर्बशनद्वारे हवेतून नायट्रोजन गॅस वेगळा केला जातो आणि तो ऑक्सिजन रुग्णांना प्रदान केला जातो. इस्त्रोचे हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर एका मिनीटाच जवळपास 10 लिटर ऑक्सिजन देण्यासाठी सक्षम आहे. तसेच या माध्यमातून एकाच वेळी दोन रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात. 


या आधीही इस्त्रोच्या वतीनं इन हाऊस मेडिकल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मोठ्या टॅंक्सच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. इस्त्रोच्या वतीनं तयार करण्यात आलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 600 वॉट पॉवरचे असेल जे 220 V/50 हर्टज् च्या वोल्टवर चालेल. यामध्ये ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रशन हे 82 टक्के ते 95 टक्के इतके असेल. यामध्ये फ्लो रेट, लो फ्लो रेट आणि हाय फ्लो रेट साठी ऑडिबल अलार्म बसवण्यात आले आहेत. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वजन 44 किलो इतके आहे. 


इस्त्रोच्या या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या निर्मितीमध्ये अनेक लोकांचा समावेश असून त्यापैकी बहुतांश लोक घरातून काम करत होते तर काहीजण प्रयोगशाळेत काम करत होते. 


इस्रोने तयार केलेल्या या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवरुन एक गोष्ट स्पष्ट होतेय ती म्हणजे इस्त्रोने केवळ स्पेज सायन्समध्येच यश प्राप्त केलं नाही तर वेळप्रसंगी, देशातील परिस्थिती लक्षात घेऊन गरजेनुसार सर्वच क्षेत्रात काम करण्याची क्षमता निर्माण केली आहे. 


महत्वाच्या बातम्या :