ISRO Chandrayaan-3 Mission : इस्रोच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ISRO ने माहिती दिली की, चांद्रयान-3 चे पुढील ऑपरेशन 6 ऑगस्ट 2023 रोजी सुमारे 23.00 वाजता पार पडणार आहे. 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच करण्यात आले होते. तेव्हापासून या यानाने चंद्राच्या अंतराच्या दोन तृतीयांश अंतर पूर्ण केलं आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहोचताच पहिला संदेश पाठवला आहे.
चंद्राच्या कक्षेत प्रवेश, चांद्रयान-3 चा इस्रोला पहिला संदेश
चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहोचताच इस्रोसाठी खास संदेश पाठवला. हा संदेश असा आहे, “MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling lunar gravity.” या संदेशामध्ये म्हटलं आहे की, “मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX), ISTRAC, बंगळुरू. हे चांद्रयान-3 आहे. मला चंद्र गुरुत्वाकर्षण जाणवत आहे.”
इस्रोने दिली महत्त्वाची माहिती?
इस्रोने ट्वीटमध्ये म्हटलं की, "चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. पुढील ऑर्बिट रिडक्शन ऑपरेशन रविवारी रात्री 11 वाजता केलं जाईल. इस्रोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असलेल्या उपग्रहाला चंद्राच्या जवळ आणण्यासाठी आणखी चार ऑर्बिट रिडक्शन ऑपरेशन केले जाणार आहेत.
चांद्रयान-3 चंद्रावर कधी उतरणार?
चांद्रयान-3 चं 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरत्या प्रक्षेपण पार पडलं. 1 ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. यानंतर आता चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचलं आहे. चांद्रयान-3 ला ट्रान्सलुनर ऑर्बिट'मध्ये ठेवण्यात आलं आहे. इस्रोने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती देताना सांगितलं होतं की, "जर सर्व काही ठीक पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :