ISKCON Monk Amogh Lila Das : इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (ISKCON) ने आपल्या संतांपैकी एक, अमोघ लिला दास (Amogh Lila Das) यांच्यावर एका महिन्यासाठी बंदी घातली आहे. इस्कॉनने अमोघ लिला दास यांच्यावर रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल हा निर्णय घेतला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरंतर, अमोघ लिला दास यांनी स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले, “जर स्वामी विवेकानंद मासे खात असतील तर ते आध्यात्मिक पुरुष आहेत का? कारण कोणताही आध्यात्मिक माणूस कधीही मासे खाणार नाही कारण माशांना देखील वेदना होतात. आध्यात्मिक माणसाच्या हृदयात करुणा असते. एवढंच नाही तर अमोघ दास लीला यांनी तर स्वामी विवेकानंदांच्या काही गोष्टी मान्य नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय रामकृष्ण परमहंसांवरही निशाणा साधला. अमोघ दास लीला यांच्या या वक्तव्यानंतर वाद सुरू झाला. त्यानंतर इस्कॉनने अमोघ लिला दास यांच्यावर एका महिन्यासाठी बंदी घातली आहे. आता अमोघ लिला दास हे महिनाभर गोवर्धनच्या डोंगरावर राहणार असून, तात्काळ ते सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे वेगळे होणार आहेत.
कोण आहेत अमोघ लिला दास?
अमोघ लिला दास हे सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांचे प्रेरक आणि भक्तिपूर्ण व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. अमोघ लिला दास यांचे खरे नाव आशिष अरोरा आहे. ते अध्यात्मिक गुरु, इस्कॉन मंदिर द्वारका (दिल्ली) चे उपाध्यक्ष आणि प्रेरक वक्ते आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोघ लिला दास लखनौच्या एका धार्मिक कुटुंबातील आहेत. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितले आहे की त्यांनी लहान वयातच त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू केला होता. सन 2000 मध्ये ते 12वीत असताना त्यांनी देवाच्या शोधात घर सोडले. मात्र, तेव्हा त्यांनी परत येऊन सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगची पदवी घेण्याचा निर्णय घेतला.
2004 मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करू लागले. 2010 मध्ये कॉर्पोरेट जग सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजरचे पदही भूषवले होते. वयाच्या 29 व्या वर्षी ते इस्कॉनमध्ये सामील झाले आणि कृष्ण ब्रह्मचारी झाले. इंजिनिअर-संत अमोघ लिला दास यांना सोशल मीडियावर अनेक लोक फॉलो करतात.
महत्त्वाच्या बातम्या :