नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना लवकरच प्रवासादरम्यान ‘रेडी टू ईट मिल’ खाण्याची संधी मिळणार आहे. यासाठी IRCTC देशभरात चार कारखाने सुरु करणार आहे. IRCTC आपला पहिला कारखाना दिल्ली-NCR आणि दुसरा कारखाना अहमदाबादमध्ये सुरु करण्याची तयारी करत आहे.


 

व्हेज-नॉन व्हेज पदार्थ

 

IRCTC ने रेल्वे स्थानकं आणि ट्रेनमध्ये 50 रुपयांत चिकन बिर्याणी आणि 40 रुपयांत राजमा चावल विक्रीची योजना आखली आहे. रेल्वे मंत्रालय ऑक्टोबरपासून देशभरात सर्व A आणि A-1 कॅटेगरी स्थानकांदरम्यान ‘रेडी टू ईट सर्व्हिस’ सुरुवात करणार आहे. व्हेज-नॉनव्हेज डिशचे पर्याय प्रवाशांना देणार आहे. विशेष म्हणजे हे पदार्थ स्वस्त आणि मस्त असणार आहेत.

 

सहा महिन्यांपर्यंत ताजं राहू शकतं!

 

‘रेडी टू ईट’ मेन्यूमध्ये मटर पनीर 45 रुपयांमध्ये, मिक्स्ड व्हेजिटेबल बिर्याणी 40 रुपयांमध्ये, लेमन राईस 40 रुपयांमध्ये आणि व्हिट उपमा 40 रुपयांमध्ये मिळणार आहे. या खास सर्व्हिससाठी IRCTC ने DRDO सोबत रिटॉर्ट टेक्नोलॉजी ट्रान्स्फरसाठी करार केला आहे. रिटार्ट टेक्नोलॉजीद्वारे अन्नपदार्थ 6 महिन्यांपर्यंत ताजं राहू शकतं.