पॉन्ड्स आणि फेअर अँड लव्हली या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत महिलांना कमी लेखण्यात येतं, असं विप्लव ठाकूर यांनी राज्यसभेत सांगितलं.
प्रत्येक फेअरनेस क्रीम स्त्रियांना सुंदर बनवण्याचे दावा करतात, पण त्याचा पाठपुरावा कुणीच करत नाही. अशा प्रकारच्या जाहिराती थांबल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर तात्काळ बंदी घातली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
ही उत्पादनं स्त्रियांमध्ये न्यूनगंड निर्माण करतात. सौंदर्यप्रसाधनांची संबंधित संस्थांकडून तपासणी केली जावी, तसंच खोटे दावे करणाऱ्या या उत्पादनांवर सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणीही खासदार ठाकूर यांनी केली.