नवी दिल्ली : रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची स्वच्छता, दर्जा यांसारख्या अनेक गोष्टींवर नेहमीच प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. याच पार्श्र्वभूमीवर आयआरसीटीसीकडून लाईव्ह स्ट्रीमिंग मॅकेनिझम तयार केलं आहे. यामुळे प्रवाशांना आता रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ कसे बनवले जातात हे लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येणार आहे.


रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी याबद्दलची माहिती दिली. तर बुधवारी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील लाईव्ह स्ट्रीमिंग सेवेचं उद्घाटन केलं.

या लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे सर्वसामांन्यांना रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ कसे बनवले जातात हे पहायाला मिळणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर हे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली.