Orissa High Court On False Cases And Misuse Section 498A : पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर सासरच्या मंडळींना धडा शिकवण्यासाठी आयपीसी कलम 498A चा दुरुपयोग (Misuse of IPC section 498 A) केला जात असल्याची टिप्पणी ओरिसा उच्च न्यायालयाने केली आहे. पतीच्या कुटुंबाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी या कलमाच्या वापरात वाढ होत असल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली. 


बुधवारी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान, ओरिसा उच्च न्यायालयाने आयपीसी कलम 498-A च्या गैरवापराबाबत अतिशय कडक टिप्पणी केली आहे. पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर सासरच्या मंडळींना धडा शिकवण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो, असे न्यायालयाने म्हटले आहे. 


Misuse of IPC section 498 A : सासूविरुद्ध कायद्याचा गैरवापर


ओरिसा उच्च न्यायालयाने एका महिलेवर तिच्या भावाच्या पत्नीने दाखल केलेला खटला रद्द ठरवला. न्यायमूर्ती जी. सतपथी यांनी ही कारवाई रद्द करत म्हटलं की, आयपीसी कलम 498A अंतर्गत अनेकदा पतीच्या कुटुंबावर दबाव आणण्यासाठी सासूच्या विरोधात गैरवापर केला जातो. क्षुल्लक मुद्द्यांवरून सुरू झालेला वाद वाढतो आणि नंतर हा मुद्दा न्यायालयापर्यंत पोहोचतो. पण पतीच्या कुटुंबावर दबाव निर्माण करण्यासाठी या कायद्याचा दुरूपयोग केला जात असल्याचं दिसून येतंय. 


What Is IPC 498 A : काय आहे कलम 498 A?


भारतीय दंड संहितेतील कलम 498 A हे घरघुती हिंचाराच्या विरोधात एक प्रमुख अस्त्र आहे. हुंड्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे सारसकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी या कलमाचा वापर केला जातो. या कलमाखाली नोंद झालेला गुन्हा हा अजामीनपात्र असतो. 


एखादी महिला सासरकडून होणाऱ्या त्रासामुळे जर आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असेल, किंवा तिच्या जीवाला धोका असेल, तिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असेल तर या कायद्यान्वये गुन्हा नोंद करता येतो. तसेच सासरच्या मंडळींनी एखाद्या महिलेकडून मालमत्तेची किंवा मौल्यवान वस्तूंची बेकायदेशीर मागणी करणे आणि मागणी पूर्ण न झाल्यास तिचा छळ करणे असा गुन्हा घडल्यास या कायद्यान्वये गुन्हा दाखल करता येतो. 


ही बातमी वाचा: