नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु केले आहेत. नवी दिल्लीत आजपासून सुरु होत असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजांना व्हिसा नाकारला. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे भारताची तक्रार केली. याप्रकरणी ऑलिम्पिक समितीने कठोर पावलं उचलत भारतात यापुढे कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी जंग जंग पछाडलं आहे. परंतु पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा नादात भारताकडून एक चूक झाली आहे. या चूकीची मोठी किंमत भारताला मोजावी लागणार आहे.
सर्वच स्तरांत पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. आजपासून नवी दिल्लीत नेमबाजी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पुलवामा हल्ल्यामुळे भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजांना भारताचा व्हिसा नाकारला. परंतु हे प्रकरण आता भारताला चांगलेच भोवणार असे दिसत आहे.
पाकिस्तानी नेमबाजांना भारताने व्हिसा नाकारल्याने पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे भारताची तक्रार करत दाद मागितली. याप्रकरणी ऑलिम्पिक समितीने भविष्यात भारतामध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित न करण्याचे ठरवले आहे.
भारताला मोठा फटका
ऑलिम्पिक समितीने भारताला विश्वचषकात 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल स्पर्धेसाठी विशेष कोटा बहाल केला होता. परंतु पाकिस्तानी खेळाडूंच्या व्हिसा प्रकरणानंतर ऑलिम्पिक समितीने हा कोटा काढून घेतला आहे.
भारत सरकार भारतात आयोजित होणाऱ्या स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येक देशाच्या खेळाडूला प्रवेश देण्याबद्दल आणि ऑलिम्पिक समितीच्या नियमांचं पालन करण्याबाबत ऑलिम्पिक समितीला लेखी आश्वासन देत नाही, तोवर याप्रकरणावर भारतासोबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचे समितीने सांगितले आहे.
पाकिस्तानला कोंडीत पकडणं भारताच्या अंगलट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Feb 2019 02:02 PM (IST)
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु केले आहेत. नवी दिल्लीत आजपासून सुरु होत असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजांना व्हिसा नाकारला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -