नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानात शिरुन एअर स्ट्राईक केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं मोठ्या हालचारी सुरु केल्या आहेत. आज सकाळी पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं भारतीय हवाई हद्दीत शिरली होती. त्यातील एक एफ-16 विमान भारतानं पाडलं आहे.


मात्र, यानंतर भारतीय वायुसेनेनं सर्व लढाऊ विमानांना अलर्टवर ठेवलं आहे. सर्व वैमानिकांना 2 मिनिटात उड्डाण करण्यास तयार राहण्यास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा सूचना युद्ध सदृश परिस्थितीत दिल्या जातात.


पंतप्रधानांची बोलावली तातडीची बैठक


भारत-पाकिस्तान सीमेवर दोन्ही बाजूने हालचालींना वेग आला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.


रुग्णालयांना अलर्ट


प्रशासनानं पाकिस्तानच्या सीमेवरील सर्व रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालयांत वैद्यकीय सामग्री आणि औषधांचा मोठ्या प्रमाणावर साठा देण्यात आला आहे.


उत्तर भारतातील विमानतळांना अलर्ट



जम्मू, श्रीनगर, लेह, अमृतसर, पठानकोट, चंडीगढ, देहरादून आणि धर्मशाला विमातळांवरील विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाकिस्तानातील विमानसेवा बंद 


घाबरलेल्या पाकिस्तानने सीमा भागातील विमानतळांवर अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानच्या लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट, इस्लामाबाद विमानतळांवरील विमानसेवा रद्द करण्यात आली आहे.


व्हिडीओ- भारताच्या तिन्ही सैन्यदल प्रमुखांची तातडीची बैठक